‘उर्मिला मातोंडकरांच्या प्रवेशानं शिवसेनेचं नशीब बदलणार असेल तर शुभेच्छा! प्रितम मुंडेंचा टोमणा

जालना । काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवणारी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर उद्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे. या पार्श्वभूमीवर “अभिनेत्री उर्मिला मातोंडकरांच्या (Urmila Matondkar) प्रवेशामुळे शिवसेनेचं नशीब बदलणार असेल तर त्यांना माझ्या शुभेच्छा”, असं म्हणत भाजप खासदार प्रीतम मुंडेंनी (Pritam Munde) शिवसेनेला टोमणा मारला. राज्य सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त प्रितम मुंडे यांनी जालन्यात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या.

“उर्मिला मातोंडकर या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. लोकसभेला त्यांनी काँग्रेसकडून नशीब आजमावून पाहिलं. आता शिवसेनेत गेल्यानं त्यांचं स्वत:चं नशीब किंवा शिवसेनेचं नशीब बदलणार असेल तर त्यांना माझ्या शुभेच्छा”, असं त्या म्हणाल्या.

राज्य सरकारची ही वर्षपूर्ती जनतेच्या निराशेची वर्षपूर्ती असल्याचं म्हणत भाजपच्या खासदार प्रितम मुंडे यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली “कुठल्याच बाबतीत हे सरकार चांगलं काम करताना दिसत नाही. त्यामुळे त्यांची वर्षपूर्ती ही जनतेच्या निराशेची वर्षपूर्ती आहे” अशी टीका प्रितम मुंडे यांनी केली. त्याचबरोबर लवकरच आपल्या कर्मानं हे जिथून आले तिथे परत जातील आणि भारतीय जनता पार्टी ही आपल्याला सत्तास्थानी दिसेल, असं प्रितम मुंडे यांनी म्हंटलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like