हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही महिन्यांपासून महाविकास आघाडी सरकारमधील आमदार, खासदार फोडण्याचे प्रयत्न शिंदे-फडणवीस सरकारकडून केले जात आहेत. शिंदे गटांकडून थेट आव्हान देत शिवसेने विरोधात भूमिका मंडळी जात आहे. तर भाजपकडून छुप्या पद्धतीने डाव टाकले जात आहेत. दरम्यान, आता भाजपचे खासदार सुजन विखे पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस पक्षात मोठा भूकंप येणार असून मोठा नेता बाहेर पडणार असे भाकीत करत गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
खासदार सुजन विखे पटली यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काँग्रेसबाबत एक भाकीत केले. ते म्हणाले की, काँग्रेसमध्ये लवकरच भूकंप होणार आहे. काँग्रेसचे ठरावीक लोकच मलिदा खात आहेत. शिवसेनेच्या आमदारांमध्ये जशी धुसफूस होती, तशीच अस्वस्थता काँग्रेसच्या आमदारांमध्ये आहे. त्यांचे स्वत:चे मंत्री देखील आमदारांची कामे करत नव्हते. त्यामुळे येणाऱ्या कालावधीत तुम्ही पाहालच.
येत्या काही दिवसात काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप होईल. राज्यातील जनताही पाहिल. ही तर सुरुवात असेल. प्रत्येकजण आपली खुर्ची सांभाळण्यात व्यस्त आहे, हेच काँग्रेसचे पहिल्यापासूनचे दुर्देव आहे. काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांनी सत्ता भोगूनही पक्षाला काहीच योगदान दिलेले नाही. फक्त स्वत:चे घर आणि प्रपंच वाढवला. नव्या पिढीला वारंवार नाकारून त्यांना लांब केले गेले. त्यामुळे अनेक युवक बाहेर पडले. त्यामुळे काँग्रेसमध्ये एकच शेवटचा तरुण राहणार आहे. तो म्हणजे राहुल गांधी, असेही विखे पाटलांनी सूचक विधान केले.