साताऱ्यातील कास धरण लवकरच होणार जनतेस समर्पित; उदयनराजेंकडून पाहणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा शहरापासून 22 किलोमीटर अंतरावर असलेल्या कास तलाव/धरणातून सातारा शहराला पाणीपुरवठा केला जातो. या ठिकाणी सध्या काम सुरु असल्यामुळे कास धरणाच्या कामाची आज साताऱ्याचे भाजपचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पाहणी केली. त्यानंतर त्यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टद्वारे हे कास धरण लवकरच जनतेस समर्पित होई, असे सांगितले आहे.

सातारा शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी 1885 रोजी कास धरण बांधण्यात आले. सातारा शहरास प्रामुख्याने कास धरण आणि उरमोडी नदीवर असलेल्या शहापूर योजनेद्वारे पाणीपुरवठा होतो. सदरबझार तसेच हद्दवाढ भागात नव्याने समाविष्ट झालेल्या दरे खुर्द, शाहूपुरी, तामजाईनगर, करंजे ग्रामीण, पिरवाडी, शाहूनगर, गोडोली, विलासपूर या परिसरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणीपुरवठा केला जातो. उन्हाची तीव्रता वाढत असताना पाण्याची प्रचंड मागणी वाढत आहे.

https://www.facebook.com/Chh.UdayanrajeBhonsleOfficial/posts/826054982215886

कास धरणातून प्रामुख्याने शहराच्या पश्चिम भागास पाणीपुरवठा केला जातो. कास धरणात गेल्या वर्षीच्या तुलनेत एक फूट जादा पाणीसाठा असला, तरी जूनमध्ये पाऊस वेळेवर पडेलच हे खात्रीशीरपणे सांगता येत नाही. धरणातील एक फूट पाणीसाठय़ावर शहराची 10-15 दिवस तहान भागते. त्यामुळे नगरपालिकेकडून एप्रिल, मे आणि जून महिन्यातील पाणीपुरवठय़ाचे नियोजन केले जाते. दरम्यान, आज खासदार उदयनराजे भोसले यांनी कास धरणाच्या कामाची पाहणी करत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी पाहणीदरम्यान नगरपालिका अधिकारी, जलसंपदा अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.