उदयनराजे भोसले यांनी घेतली अजित पवारांची भेट; चर्चाना उधाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. पुण्यातील शासकिय विश्रामगृहात दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाली. आपण कामासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांना भेटण्यासाठी आलो असल्याचं खासदार उदयनराजे भोसेले यांनी सांगितलं आहे.

सातारा पालिकेच्या विकास कामांच्या निमित्ताने खासदार उदयनराजेंनी पुण्यातील शासकिय विश्रामगृहातील व्हीव्हीआयपी सुटमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांना सातारा पालिकेच्या हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या भागाच्या विकासासाठी ४८ कोटी ५० लाख रूपयांचे अनुदान राज्य सरकारने द्यावे, अशी मागणी केली. आगामी काळात सातारा नगरपालिकेची निवडणूक देखील आहे. त्या निवडणुकीवर देखील आजच्या भेटीचा परिणाम होण्याची शक्यता असल्याचं बोललं जातंय.

दरम्यान यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार का? असा प्रश्न उदयनराजे यांना विचारला असता त्यांनी या प्रश्नावर उदयनराजे भोसले यांनी सूचक उत्तर देत म्हटलं, जसा सर्वधर्मभाव तसाच सर्व पक्ष समभाव मी मानतो असे ते म्हणाले.