हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूकीत भाजपने तब्बल 11 जागा जिंकत महाविकास आघाडीचा धुव्वा उडवला आहे. या विजयानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांवर जोरदार प्रहार केला. राज्याचे अर्थमंत्री येतात आणि पक्षाला हरवून जातात यालाच अक्कल म्हणतात अस म्हणत राणेंनी राणेंनी अजित पवारांना फटकारले.
नारायण राणे म्हणाले, जिल्हा बँक निवडणुकीत तिन्ही पक्ष एकत्र येतात, राज्याचे अर्थमंत्री येतात आणि पक्षाचा पराभव करून जातात यालाच अक्कल म्हणतात असे म्हणत नारायण राणे यांनी अजित पवारांचा समाचार घेतला तर राज्याला चांगल्या मुख्यमंत्र्यांची गरज असून राज्यातील जनतेच्या सुखासाठी राज्यात भाजपच सरकार हवं आणि त्यासाठी आता आमचं पुढच लक्ष हे महाराष्ट्र सरकार हेच असेल असे म्हणत त्यांनी महाविकास आघाडीला इशारा दिला.
दरम्यान, जिल्हा बँकेतील सत्ता ही माझी नव्हे तर भाजपची सत्ता आहे. जिल्ह्यातील देवदेवता आणि जनता यांच्या आशीर्वादाने ही सत्ता आली आहे. माझे कार्यकर्ते आणि नितेश राणेंनी घेतलेली मेहनत. राजन तेली आणि निलेश राणेंनी दिलेली साथ यामुळे हा विजय मिळवला असे नारायण राणे यांनी म्हंटल.