हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यात केलेलं भाषण म्हणजे निर्बुद्ध बरळणं होतं अशी टीका भाजपा खासदार नारायण राणे यांनी केली आहे. माझ्या आयुष्यात आतापर्यंत जे जे मुख्यमंत्री झाले त्यांनी आपल्या भाषणाने शैलीने विचाराने आणि कामाने आपली आणि महाराष्ट्राची प्रतिष्ठा वाढवली. त्याला आत्ताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अपवाद आहेत. मुख्यमंत्री पदासाठी हा माणूस लायकच नाही, त्यांच्या भाषणात कोणत्याही प्रकारचा ताळमेळ नव्हता असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, कोणत्याही योजना, करोनाचं संकट याबाबत काहीही भाष्य उद्धव ठाकरे यांनी केलं नाही.
राज्यात केलेल्या कोणत्याही कामाचा त्यांनी कालच्या भाषणात उल्लेख नाही. त्यांनी कालच्या भाषणात ना शेतकऱ्याचा उल्लेख केला, ना राज्याच्या आर्थिक स्थितीबद्दल ते बोलले. मुख्यमंत्र्यांना काय बोलावं कसं बोलावं हे अजून कळत नाही. मुख्यमंत्री पदासाठी हा माणूस लायकच नाही असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे. करोनामुळे महाराष्ट्रात ४३ हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याला जबाबदार कोण? असाही प्रश्न नारायण राणे यांनी विचारलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी दसरा मेळाव्यात नारायण राणे आणि त्यांच्या मुलांना बेडूक आणि बेडकाची पिल्ले, अशा अप्रत्यक्ष शब्दांत टोले लगावले होते. या टीकेला नारायण राणे यांनी सोमवारी मुंबईतील भाजप मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत प्रत्युत्तर दिले.
'राणे कुटुंब आणि भाजपवर टीका कराल तर याद राखा! सर्व बाहेर काढेन'; नारायण राणेंचा धमकीवजा इशारा
वाचा सविस्तर -👉 https://t.co/H3aRBGh6XU@NiteshNRane @meNeeleshNRane #HelloMaharashtra @UdhavArora3— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 26, 2020
उद्धव ठाकरेंनी बेईमानी करून मुख्यमंत्रीपद मिळवलं; नारायण राणेंचा हल्लाबोल
वाचा सविस्तर – https://t.co/TCHY0ZJ7vD@CMOMaharashtra @NiteshNRane @meNeeleshNRane #HelloMaharashtra— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 26, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’