कोण राजे? मी तर त्यांना राजे ही उपाधीही देत नाही- नारायण राणे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात राजकीय वातावरण तापलं असून छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन करून सरकारला इशारा दिला होता. असे असूनही भाजप खासदार नारायण राणे यांनी पुन्हा एकदा संभाजीराजेंवर निशाणा साधला. कोण राजे? मी तर त्यांना राजे ही उपाधीही देत नाही असे नारायण राणे यांनी म्हंटल.

नारायण राणे म्हणाले, कोण राजे? एक छत्रपती शिवाजी महाराज सोडले तर मी दुसऱ्या कुठल्याही राजांना ओळखत नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी या राजांच्या मागे धावू नका. मी तर त्यांना राजे ही उपाधीही देत नाही, अशी टीका खासदार नारायण राणे यांनी केली आहे.

शिवाजी महाराज एकटे होते, तरी त्यांनी स्वराज्य स्थापन केले. आपण सुमारे पाच कोटी आहोत, तरीही आपल्याला आरक्षण मिळत नाही. आरक्षण मिळविण्यासाठी कशाला कोणत्या राजाची आणि महाराजाची वाट पाहता?, असं वक्तव्य देखील नारायण राणे यांनी केलं आहे.