हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावलं आहे. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस बजावली आहे.दरम्यान भाजप नेते खासदार नारायण राणे यांनी यावरून संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत नेहमी बडबड करतात, मग जाऊदेना जरा ईडीच्या समोर”, अशा शब्दात त्यांनी राऊतांवर टीकास्त्र सोडलं. तसेच केंद्र सरकार अंतर्गत ईडी आणि सीबीआय आहे. ईडी आणि सीबीआय पुरावे असल्याशिवाय कोणाची चौकशी करत नाही”, असा टोला त्यांनी लगावला.
त्यांनी पीएमसी बँकेत गैरव्यवहार केले. एक कोटीला घेतलेली मालमत्ता किती कोटीची आहे? आज त्याची किंमत अकरा ते बारा कोटी आहे. मग ती मालमत्ता एक कोटीला कशी काय मिळाली? आणि मग एक कोटीला कर्ज दाखवायचं, म्हणून ईडीला तक्रार गेली. त्या बँकेची चौकशी सुरू असताना हे पुरावे मिळाले, म्हणून ईडीने ही नोटीस दिली. असंच कोणी ईडी वैगेरे नोटीस देत नाही”, असं नारायण राणे म्हणाले.
तुम्ही काहीही करा, आम्ही घाबरत नाही – संजय राऊत
आमच्यासाठी ईडी हा महत्त्वाचा विषय नाही. गेल्या काही वर्षापासून ईडीची नोटीस येणं, कारवाई करणे म्हणजे एखाद्या राजकीय पक्षाने आपली भडास काढणं असं लोकांनी गृहित धरलं आहे. सत्तेतील राजकीय पक्षाला, केंद्रातल्या किंवा राजकीय विरोधकांना राजकीय दृष्ट्या संपवता येत नाही. त्यामुळे ईडी, सीबीआय सारखे हत्यारे वापरावी लागतात. असा आरोप राऊतांनी केला. तुम्ही नोटीस पाठवा नाहितर आम्हाला घरी येऊन अटक करुन घेऊन जा. आम्ही घाबरत नाही. मात्र हे बायकांच्या पदराआडून केलेली खेळी तुमच्यावर पलटल्याशिवाय राहणार नाही असं म्हणत राऊत यांनी भाजपवर निशाना साधलाय.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’