नारायण राणेंकडून राज ठाकरेंची पाठराखण; शिवसेनेवर केली सडकून टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात राज्यातील ठाकरे सरकार वर जोरदार टीका केल्यानंतर महाविकास आघाडी विरुद्ध राज ठाकरे असा सामना रंगला आहे. त्यातच आता भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी यात उडी घेत शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

नारायण राणे यांनी एकामागून एक ट्विट करत म्हंटल, गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर श्रीयुत राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील आघाडी सरकारचा पंचनामा केला. महाराष्ट्रातील वास्तववादी चित्र त्यांनी सांगितले, हे काही जणांना झोंबले आणि त्यांनी प्रतिक्रिया दिल्या. ज्यांनी आयुष्यभर स्वार्थी, सोयीने सत्ता मिळवली त्यांनी राज ठाकरे यांच्या भाषणावर प्रतिक्रिया द्यावी, हे ही एक आश्चर्य आहे.

२०१९च्या निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपशी गद्दारी केली त्याहीपेक्षा मोठी गद्दारी हिंदुत्वाशी आहे. पदासाठी, पैशासाठी गद्दारी करणाऱ्यांनी राज ठाकरेंना कितीही उत्तर दिले असले, तरी ‘गद्दारी ती गद्दारीच’. हे निष्ठेचे राजकारण नाही, हे पद आणि सत्तेसाठीचे राजकारण आहे.

दरम्यान, गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी सरकार वर जोरदार प्रहार केला. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी भाजपविरोधात एकही शब्द टीका केली नाही. उलट त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. यामुळे आगामी काळात मनसे आणि भाजपमध्ये युती होणार का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष्य लागले आहे.

Leave a Comment