हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसामुळे महापूर आला तसेच अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याने अनेक ठिकाणी लोकांचा मृत्यू झाला. चिपळूण ला या महापुराचा मोठा फटका बसला असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झालं आहे. महापुरामुळे अनेक ठिकाणी घरे, शेती आणि रस्ते वाहून गेले आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते निलेश राणे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. हे शहर आपल्याला नव्याने उभे करायचे आहे. तेव्हा इथे फुकट फिरायला येऊ नका, मदत घेऊन या असे आवाहन निलेश राणे यांनी केलं आहे.
निलेश राणे म्हणाले, आम्ही गेल्या दोन दिवसांपासून इथे काम करित आहोत. इथे सत्ताधारी पक्षाचे नेते इकडे तिकडे फिरताना दिसतात. त्यांनी फुकटच्या सहली करु नयेत, लोकांना मदत करावी’, असा सल्ला राणे यांनी दिला. ‘एनडीआरएफचे लोक काम करित आहेत, पण एसडीआरएफ कुठेही दिसत नाही’, अशी टीका त्यांनी केली.
दरम्यान आज माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजप नेत्यांकडून कोकण दौरा करण्यात आला आहे. दर दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुद्धा चिपळूण दौऱ्यावर असून नुकसान ग्रस्तांची विचारपूस करत आहेत.