हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांवर आयकर विभागाची छापेमारी सुरू असतानाच अजित पवार आता जास्त दिवस बाहेर राहणार नाहीत असा खळबळजनक दावा भाजप नेते निलेश राणे यांनी केला आहे. अजित पवार यांनी रडणं बंद करावं. जास्त दिवस शिल्लक नाहीयेत आता असं राणे म्हणाले.
अजित पवारांवर धाडी पडतात याचा अर्थ त्यांनी काही तरी गडबड केली असणार. गडबडीसाठीच त्यांचं नाव प्रसिद्ध आहे. विधायक कामांसाठी त्यांचं नाव आहे असं एखादं उदाहरण मिळणार नाही. म्हणून त्यांच्या घरावर त्यांच्या कंपन्यांवर रेड पडतेय याचा अर्थ गडबड केली असणार त्यांनी. म्हणून रेड पडत आहे असे निलेश राणे यांनी म्हंटल.
अजित पवार आता यातून सुटू शकणार नाही. हे त्यांनाही कळून चुकलं आहे, असं सांगतानाच माझ्यावर असं झालं तसं झालं. असं ते सांगत आहेत. मागेही रडले होते पत्रकार परिषदेत. राष्ट्रवादीत रडेच भरले आहेत. यांच्यावर आरोप झाल्यावर हे रडतात. तुम्ही कारवाईला सामोरे जा. राजीनामा द्या. मग बघू तुमचं काय होतं ते, असं आव्हानच त्यांनी दिलं.