हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते निलेश राणे यांनी आज पुन्हा एकदा शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत हे पवारांचा माणूस आहे. ते 100 टक्के शिवसेना संपवून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार होतील अशी टीका निलेश राणे यांनी केली.
निलेश राणे म्हणाले, निलेश राणे म्हणाले की, संजय राऊत यांना किती सीरियस घ्यायचे हे आता पत्रकारांनी ठरवायला हवे. हा शंभर टक्के पवारांचा माणूस आहे. ते पगार सामनाचा घेतात आणि इमानी पवार साहेबांची करतात. संजय राऊत शिवसेना संपवून राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार होतील, असा आरोपही निलेश राणे यांनी केला.
पुढे बोलताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सुरू असलेल्या पोलीस चौकशी वरूनही निशाणा साधला. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांमुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. त्यामुळे त्यांना अशा केसेस टाकून घाबरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, फडणवीस सर्वाना पुरून उरतील. ते किती तरी ठाकरे आणि पवार खिशात घेऊन फिरतात असे राणें यांनी म्हंटल.