दोन वर्षे वसुलीची, निर्लज्जपणाची आणि लाचारीची; राणेंचे सरकारवर ताशेरे

0
70
Nilesh Rane Uddhav Thackarey
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडी सरकारला 2 वर्ष पूर्ण झाली. एकीकडे सत्ताधारी आपल्या सरकारचे गोडवे गात असताना दुसरीकडे विरोधक मात्र सरकारच्या 2 वर्षाच्या कामगिरी वरून टीका करत आहेत. याच दरम्यान भाजप नेते निलेश राणे यांनी ट्विट करत सरकारवर तोंडसुख घेतले.

दोन वर्षे वसुलीची, निर्लज्जपणाची, बिनकामाची, मूर्खपणाची, ड्रग माफियाची, महिलांवर अत्याचाराची, हिंदू विरोधाची, शेतकरी व कामगारांना संपवण्याची, अर्थ व्यवस्थेला कीड लावण्याची, दंगली घडवण्याची आणि लाचारीची असे म्हणत निलेश राणे यांनी सरकार वर ताशेरे ओढले.

दरम्यान, भाजपचे अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी देखील सरकारवर टीका केली आहे. महाविकास आघाडी सरकारची दोन वर्षे ही राक्षसी सत्तेची आहेत. महाराष्ट्रासाठी कोणतीही कामगिरी न करता वसुली, भ्रष्टाचार, अनाचार, दुराचार करत व्यसनाधीनांसाठी पायघड्या टाकून हे सरकार सत्तेवर आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. शिवाय साधू-संत-वारकरी यांच्यावर सातत्याने अन्याय करणाऱ्या ‘राक्षसी’ सत्तेला आज दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. या सत्तेतून पांडुरंगा,महाराष्ट्राला लवकर मुक्त कर, अशी विनवणी ही भोसले यांनी असे तुषार भोसले यांनी म्हंटल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here