हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संस्था उभा करायला अक्कल लागते, बंद करायला लागत नाही असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना टोला लगावल्यानंतर भाजप नेते निलेश राणे यांनी अजित पवारांवर पलटवार केला आहे. ज्याच नाव लिहून शेतकरी आत्महत्या करतात तो माणूस सहकारातील ज्ञान पाजळतोय अस म्हणत आधी स्वतःच्या नाकातलं शेंबुड पुसा असा टोला निलेश राणे यांनी लगावला.
राज्य सहकारी बँक लुटली, सहकारी साखर कारखाने आजारी पाडून कवडीमोल किंमतीत खरेदी करून स्वतःच्या कुटुंबियांच्या नावे केले. ज्याच नाव लिहून पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या करतात तो माणूस सिंधुदुर्गात येऊन सहकारातील ज्ञान पाजळतो. अजित पवार स्वतःच्या नाकातलं शेंबुड पुसा अगोदर. अस ट्विट निलेश राणे यांनी केलं.
राज्य सहकारी बँक लुटली, सहकारी साखर कारखाने आजारी पाडून कवडीमोल किंमतीत खरेदी करून स्वतःच्या कुटुंबियांच्या नावे केले. ज्याच नाव लिहून पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या करतात तो माणूस सिंधुदुर्गात येऊन सहकारातील ज्ञान पाजळतो. अजित पवार स्वतःच्या नाकातलं शेंबुड पुसा अगोदर.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) December 27, 2021
अजित पवार नेमकं काय म्हणाले-
सिंधुदुर्गच्या जिल्हा बँकेच्या प्रतिनिधींना, मतदारांना मला सांगायचं आहे की बाबांनो फार विचार करून मतदान करा. संस्था उभ्या करायला डोकं लागतं, अक्कल लागते. मात्र, संस्था अडचणीत आणायला डोकं, अक्कल लागत नाही. सर्वांनी निर्धाराने मतदान करा. कुणाच्याही दबावाला, दादागिरीला, दहशतीला बळी पडण्याचं अजिबात कारण नाही. इथं कशाप्रकारे काही घटना घडल्या याचा इतिहास तुम्हा सर्वांच्या समोर आहे. म्हणून मतदारांनी गाफील राहू नका अशी विनंती आहे.”