हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन : ‘ अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत. याबरोबरच ते अर्थमंत्रीही आहेत हे त्यांनी लक्षात घ्यावे. वाढत चाललेल्या कोरोनाला हाताळण्याचे नियोजन दर्जेदार करा पण नोकरी,धंद्यांचे नुकसान होता कामा नये. महाराष्ट्राची वाट लावू नका.” असा माजी खासदार आणि भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे.
माजी खासदार आणि भाजप नेते निलेश राणे यांनी नुकतेच आपल्या ट्विटर अकाउंटद्वारे ठाकरे सरकार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामाबाबत माहिती घेत परखड मत व्यक्त केलेत. राणेंनी आपल्या ट्विटरवरून पुढे म्हंटले आहे कि, “अजित पवारांना अर्थमंत्री असल्याचा विसर, मुख्यमंत्र्यांना त्यांनी सांगावं कि आता लॉकडाऊन परवडणार नाही”
अजित पवार विसरलेत की ते नुसते उपमुख्यमंत्री नाही अर्थमंत्री सुद्धा आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांना स्वतःहून सांगितलं पाहिजे की लॉकडाऊन हे महाराष्ट्राला परवडणार नाही. कोरोना हाताळण्याची सिस्टम दर्जेदार करा पण नोकरी धंद्यांचे नुकसान होता कामा नये. महाराष्ट्राची वाट लावू नका.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) March 29, 2021
काल मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बंगल्याबाहेरील स्फोटक प्रकरणावरून निलेश राणे यांनी घणाघाती आरोप केला होता . मुकेश अंबानीच्या घराबाहेर जिलेटीन असलेली गाडी का उभी केली ते एनआयच्या तपासात पुढे येईल, हे प्रकरण शिजवत कोण होतं, याचे धागेदोरे कलानगरच्या बंगल्यापर्यत जातील, असं सांगत निलेश राणेंनी शिवसेनेला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. फुकटात मंत्रिपद मिळालेल्या जितेंद्र आव्हाडांची उगाच वळवळ सुरु आहे, ते कोणाची एजंटगिरी करतायत? असा सवालही त्यांनी विचारला होता. त्यांच्यानंतर आता राणेंनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा WhatsApp Group | Facebook Page