हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यानं स्वप्नील लोणकर या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्यानंतर राज्यातील वातावरण तापल होत. त्यानंतर 31 जुलै अखेर सर्व नियुक्त्या करण्यात येतील अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती. मात्र अद्याप पदे भरली नसल्याने भाजपकडून अजित पवारांवर टीका करण्यात येत आहे.
भाजपचे नेते निलेश राणे यांनी ट्वीट करत अजित पवार यांच्यावर निशाना साधला आहे. ‘MPSC मार्फत भरण्यात येणारी सर्व रिक्त पदे ३१ जुलै पूर्वी भरण्याची घोषणा अजित पवार यांनी केली होती आज ३१जुलै आहे रिक्त पदे अद्याप भरलेली नाही. अजित पवार साहेब तुम्ही लॉलीपॉप बनवायची फॅक्टरी टाका, शोभेल तुम्हाला.’ अस ट्वीट करून त्यांनी अजित पवार यांच्यावर टीकास्त्र डागले आहे.
MPSC मार्फत भरण्यात येणारी सर्व रिक्त पदे ३१ जुलै पूर्वी भरण्याची घोषणा अजित पवार यांनी केली होती आज ३१जुलै आहे रिक्त पदे अद्याप भरलेली नाही. अजित पवार साहेब तुम्ही लॉलीपॉप बनवायची फॅक्टरी टाका, शोभेल तुम्हाला. pic.twitter.com/SoZHGlk9aE
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) July 31, 2021
दरम्यान, अजित पवार यांनी केलेल्या या घोषणेवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवसी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांनी एमपीएससीबाबत केलेली घोषणा खोटी असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी याआधी केला होता.