सत्तेत बसून पिसाळलेल्या कुत्र्या सारखे वागू नका; निलेश राणेंची मलिकांवर जहरी टीका

nilesh rane nawab malik
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ब्रूक फार्मा कंपनीचे मालक डोकानिया यांच्या अटकेनंतर त्यांना सोडवण्यासाठी या राज्याचे दोन-दोन विरोधी पक्षनेते आणि आमदार पोलिसांकडे का गेले? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केल्यानंतर आता निलेश राणे यांनी मलिक यांना फटकारले आहे. सत्तेत बसून पिसाळलेल्या कुत्र्या सारखे वागू नका. अशा कडक शब्दात निलेश राणेंनी नवाब मलिक यांचा समाचार घेतला आहे.

निलेश राणे म्हणाले, नवाब मलिक स्वतःलाच चावलाय वाटतं… आदित्य ठाकरे तेव्हाच्या मुंबई कमिशनरांना सुशांत सिंग राजपूत ची केस चालू असताना का भेटायला जायचा? फडणवीस साहेब तरी अधिकृत विषयासाठी पोलिसांना भेटले. सत्तेत बसून पिसाळलेल्या कुत्र्या सारखे वागू नका. आरोग्य सेवा चांगली द्या, लोकांचे जीव वाचवा.

नवाब मलिक नक्की काय म्हणाले-

डोकानियाला सोडवण्यासाठी या राज्याचे दोन-दोन विरोधी पक्षनेते आणि आमदार का गेले? राज्यात कुठेतरी भाजपाची लोकं साठा मिळणार नाही यासाठी प्रयत्न करत आहेत. असा आरोप नवाब मलिक यांनी केला. जो साठा आहे तो विकत घेऊन आपण विकू ही भूमिका घेत आहेत. साठा देऊ शकतात त्यांना ऑर्डर द्या अशी भूमिका घेत आहेत. पण पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर जेव्हा एखाद्या व्यक्तीला बोलावल्यानंतर हे नेते का जातात हा मोठा प्रश्न आहे,” अशी विचारणा नवाब मलिक यांनी केली आहे.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.