हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | औरंगाबाद शहराचं नामकरण संभाजीनगर करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे वृत्त माध्यमात झळकत असतानाच महाविकास आघाडीतीलच घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने यासाठी विरोध केला आहे. औरंगाबादच्या नामांतरणाला आमचा विरोध असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ठामपणे सांगितलंय. त्यावरुन आता आघाडीत ठिणगी पडली असून राजकारण सुरू झाल्याचं दिसून येतंय.
त्यानंतर, भाजपा आमदार नितेश राणे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शिवसेनेला डिवचले आहे. ”काँग्रेसने सांगून टाकले संभाजीनगर होणार नाही! आता बघू… बाळासाहेबांचा शब्द महत्वाचा की सत्तेची लाचारी!” संभाजी राजेंचा स्वाभिमान महत्वाचा की मुख्यमंत्री पदाची खुर्ची !!!, असे ट्विट करत नितेश राणेंनी शिवसेनेवर शाब्दीक प्रहार केलाय.
काँग्रेसने सांगून टाकले संभाजीनगर होणार नाही! आता बघू..
बाळासाहेबांचा शब्द महत्वाचा की सत्तेची लाचारी!
संभाजी राजेंचा स्वाभिमान महत्वाचा की मुख्यमंत्री पदाची खुर्ची!!!
— nitesh rane (@NiteshNRane) December 31, 2020
नक्की काय म्हणाले बाळासाहेब थोरात –
महाविकास आघाडीत काँग्रेस म्हणून आम्ही घटक पक्ष आहे, पण नामांतराला आमचा विरोध राहिल, असे थोरात यांनी स्पष्टपणे सांगितलंय. महाविकास आघाडीमध्ये कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरलेला आहे, त्यामुळे जेव्हा नाव बदलासंदर्भात प्रस्ताव येईल, तेव्हा आमचा विरोध राहिल. पण, अद्याप तसा कुठलाही प्रस्ताव समोर नसल्याचंही थोरात यांनी स्पष्ट केलंय.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’