अधिवेशनात विरोधक फाडून खातील म्हणून कोरोनाचं भांडवल ; निलेश राणेंचा गंभीर आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते निलेश राणे यांनी आज पुन्हा एकदा ठाकरे सरकार वर टीका केली आहे. अधिवेशन तोंडावर आल्यामुळे सत्ताधारी ते टाळण्यासाठी कोरोनाचं भांडवल करत आहेत. अधिवेशनात विरोधक फाडून खातील, अशी भीती सत्ताधाऱ्यांना वाटतेय, अशी टीका निलेश राणे यांनी केलीय.

मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार वाढला आहे. सरकारमधील अनेक मंत्री कुठल्या तरी भानगडीत अडकले आहेत. त्यावर विरोधक फाडून खातील. विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरं द्यायला ना मुख्यमंत्री समर्थ आहेत ना उपमुख्यमंत्री, अशा शब्दात निलेश राणे यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलं

यापूर्वी नितेश राणे यांनी साधला होता निशाणा –

दरम्यान, भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सरकार मधील नेत्यांना झालेला कोरोना खरा आहे की राजकीय असाच प्रश्न उपस्थित केलाय. महाराष्ट्रभर फिरणाऱ्या मंत्र्यांना 8 दिवसांमध्ये झालेला हा कोरोना कोविड 19 चा आहे की राजकीय कोरोना आहे? कारण येणाऱ्या अधिवेशनात भारतीय जनता पक्षाच्या प्रश्नांना द्यायला यांच्याकडे उत्तर नाही. म्हणून राज्य सरकार कोरोनाचा आसरा घेत नाही ना हा प्रश्न माझ्या मनात आहे. अस नीतेश राणे म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment