स्वतःच्या बुडाखाली काय जळतं आहे ते आधी बघा; राणेंचे शिवसेनेला प्रत्युत्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपने गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवल्यानंतर शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून भाजपवर टीका केली होती. गुजरात विकासाच्या मार्गावर चालत आहे असं वाटतं असेल तर मग एका रात्रीत मुख्यमंत्री बदलण्याची वेळ का आली ? असा परखड सवाल शिवसेनेने केल्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी देखील शिवसेनेला प्रत्युत्तर दिले आहे.

निलेश राणे यांनी ट्विट करत शिवसेनेवर पलटवार केला. गुजरात मॉडेलच सोडा, तुम्ही ऐन कोरोना काळात मुंबई पालिका आयुक्त परदेशी का बदलले ते सांगा?, तुमचं ते मुंबई मॉडेलचे काय चाटायचं आम्ही??, स्वतःच्या बुडाखाली काय जळतं आहे ते आधी बघा, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

सामना अग्रलेखात नेमकं काय म्हणाले-

लोकशाहीचं, राज्यकारभाराचं आणि विकासाचं गुजरात मॉडेल अशा प्रकारे फुगा फुटावा तसं टपकन फुटलं आहे. गुजरात राज्य जर विकास, प्रगतीच्या मार्गावर पुढे जात होतं, तर मग अशा पद्धतीने रातोरात मुख्यमंत्री बदलाची वेळ का आली?, असा करत सवाल संजय राऊत यांनी केंद्रावर निशाणा साधला होता. भाकरी ही फिरवावीच लागते, पण एखादे राज्य जेव्हा विकास किंवा प्रगतीचे ‘मॉडेल’ असल्याचे आदळआपट करीत सांगितले जाते, तेथे अचानक नेतृत्वबदल घडवला की, मग लोकांच्या मनात शंका निर्माण होतात.

Leave a Comment