मुंबई | शरद पवार राजकारणातील मोठे नेते आहेत. त्याच्याकडून लोक मार्गदर्शन घेत असतात, तसेच चर्चाही करत असतात. शरद पवार आणि शिवसेना एकत्र असल्याने भाजप सत्तेबाहेर आहेत. त्यांचे दुः ख मी समजू शकतो असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपाला लावलेला आहे.
संजय राऊत म्हणाले, आजच्या बैठकीत महत्वाचे काही नाही, विरोधकांची मोट म्हणत आहात, त्यामध्ये शिवसेना, मायावतीसह अन्य पक्ष नाहीत. त्यामुळे केवळ यशवंत सिन्हा यांच्यासोबत बैठक आहे. संसदीय लोकशाहीत एका मजबूत विरोधी पक्षांची गरज आहे, त्यासाठी शरद पवार एकजूट करत आहेत.
देशात तिसरी आघाडी होण्यासाठी काॅंग्रेस आणि शिवसेनेशिवाय होवूच शकत नाही. मोदी विरोधी किंवा भाजप विरोधी असे शब्द वापरू नये. देशात एकजूट बांधण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे या बैठकीकडे वेगळ्या पध्दतीने पाहू नये, असेही संजय राऊत यांनी सांगितले.