शरद पवार युपीएला नक्कीच फायदा करून देतील, पण….पंकजा मुंडेंचं मोठं वक्तव्य

0
42
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची युपीएच्या अध्यक्षपदी वर्णी लागू शकते अशा बातम्या काल रंगल्या होत्या. कॉंग्रेसनेच पवारांना ही ऑफर दिल्याचे देखील समजले होते, पंरतु खुद्द शरद पवार यांनी अशा प्रकारच्या विधानात काहीही तथ्य नसल्याचे स्पष्ट करत या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. दरम्यान भाजपा नेत्या पंकजा मुंडेंनीही शरद पवार यांच्या अध्यक्षपदाचा युपीएला फायदा होईल, असे म्हटले आहे. परंतु भाजपला काहीही फरक पडणार नाही असेही त्या म्हणाल्या.

पंकजा मुंडे म्हणाल्या, शरद पवार हे संयुक्त पुरोगामी आघाडी म्हणजेच युपीएचे अध्यक्ष झाले तरी भाजपाला त्या निवडीचा काहीही फरक पडणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजप मजबूत आहे, मोदींचं नेतृत्व सक्षम आहे. मात्र, शरद पवार यांच्या नेतृत्वाचा युपीएला निश्चितच फायदा होईल. पवार यांचा अनुभव मोठा आहे, त्यांचे सर्वपक्षीय नेत्यांसोबतचे संबंध मैत्रीपूर्ण आहेत. त्यांच्या सोशल इंजिनिअरींगचा ते युपीएला फायदा करुन देऊ शकतात. पण, याची आम्हाला चिंता नाही. कारण, भाजपाला काहीही फरक पडणार नाही, असे पंकजा यांनी म्हटलंय.

दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही याबाबत आपलं मत व्यक्त करताना म्हंटल होत की “शरद पवार जर युपीएचे अध्यक्ष झाले तर आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. पण मला अशी कोणतीही शक्यता दिसत नाही. शरद पवारांनीही हे वृत्त नाकारलं आहे. शरद पवार महाराष्ट्राचे, देशाचे खूप मोठे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वात आम्ही सगळे काम करत आहोत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here