२०१७ मध्ये मुख्यमंत्री जबाबदार तर २०२१ मध्ये पाऊस जबाबदार, ऐसा कैसे चलेगा; भाजपचा शिवसेनेवर निशाणा

0
74
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने मुंबईतील वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये 30 जणांचे बळी घेतले. एकूण 11 ठिकाणी घरे, घरांच्या भिंती, दरड किंवा संरक्षक भिंत कोसळण्याच्या घटना घडल्या. या घटनेनंतर विरोधकांनी शिवसेनेवर निशाणा साधल्यांनंतर शिवसेनेनं देखील सामना अग्रलेखातून प्रत्युत्तर देत विरोधकांना खडेबोल सुनावले.

या पार्श्वभूमीवर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी २०१७ मधील सामना अग्रलेखातील संदर्भ ट्विट करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ये मुंबई है…ये सब जानती है..” २०१७ मध्ये मुख्यमंत्री जबाबदार…आणि २०२१ मध्ये पाऊस जबाबदार… ऐसा कैसे चलेगा…असं प्रसाद लाड यांनी म्हंटल आहे. तसेर्च हॅशटॅग करप्शन आणि BMC असेही म्हंटल आहे.

सामना अग्रलेखात नेमकं काय म्हंटल –

पावसाळ्यापूर्वी आणि प्रत्यक्ष मुसळधार पाऊस कोसळतो तेव्हा प्रशासनातर्फे आवश्यक खबरदारी घेतली जात असते. तरीही कधीकधी ‘अनैसर्गिक’ पावसाचा ‘दगाफटका’ होतो. १७ जुलैच्या मध्यरात्री मुंबईत दुर्घटनांची ‘दरड’ कोसळली ती अनैसर्गिक पावसामुळेच. मुंबईत पावसाने काही झाले की मुंबई महापालिकेच्या नावाने बोटे मोडणाऱ्यांनीही हे लक्षात घेतले पाहिजे”, असं म्हणत शिवसेनेनं विरोधकांना खडेबोल सुनावले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here