हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करताना जीभ घसरली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गरीबांकडे पहाण्यासाठी वेळ नाही आहे. रंगलेल्या गालाचे मुके घेणारा हा पक्ष आहे असं वादग्रस्त वक्तव्य प्रवीण दरेकर यांनी केल आहे. लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांचा 16 सप्टेंबर ला राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे. यावरून प्रविण दरेकर यांनी राष्ट्रवादी कॉग्रेसला टोला लगावला आहे.
प्रवीण दरेकर आज शिरुर दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गरीबांकडे पहाण्यासाठी वेळ नाही आहे. रंगलेल्या गालाचे मुके घेणारा हा पक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा बँकवाल्यांचा, कारखानदारांचा पक्ष आहे. तर भाजप हा गोरगरीबांचा पक्ष आहे. अस दरेकरांनी म्हंटल.
राज्यात महिलांवर अत्याचार, बलात्कार,विनयभंग होत आहेत. पुण्यनगरीत एक दिवस असा नाही कि बलात्कार अत्याचार होत नाही. राज्यातील या अत्याचार, बलात्काराच्या घटना घडतात या सर्व गोष्टीला सरकारचा नाकार्तेपणा जबाबदार असुन सरकारचा गुन्हेगारी प्रवृत्तीवर अंकुश नाही, यांचं प्राधान्य अत्याचाराच्या घटना थांबविण्यासाठी नाही तर सत्ता टिकविण्यासाठी सुरुय असल्याचा आरोपही दरेकर यांनी केला आहे.