दरेकरांचं विरोधी पक्षनेतेपद धोक्यात?? राष्ट्रवादीने गाठलं खिंडीत; नेमकं काय आहे प्रकरण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या सहकार पॅनेलनं २१ जागा पटकावत विजय मिळवला मात्र तोच ज्या मजूर प्रवर्गातून दरेकर निवडून येतात त्यावर सहकार विभागाने आक्षेप घेत दरेकरांना “मजूर” म्हणून अपात्र ठरवले आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दरेकरांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

प्रवीण दरेकर याना विरोधी पक्षनेतेपदी राहण्याचा नैतिक अधिकार राहिलेला नाही मुंबई बँकेच्या निवडणुकीमध्ये स्वतःला मजूर म्हणायचं आणि विधानपरिषद निवडणुकीच्या प्रतिज्ञा पत्रात स्वतःला उद्योजक म्हणायचं अशी धूळफेक फक्त भाजपचे नेतेच करू शकतात. राज्यातील भाजपचा एक जबाबदार नेता अशा प्रकारची धूळफेक करतो तेव्हा भाजपची नैतिकता कुठे जाते असा सवाल महेश तपासे यांनी केला.

महाराष्ट्र सहकार विभागाने कारवाई करत प्रवीण दरेकर याना अपात्र ठरवलं त्यामुळे या सर्व गोष्टी सर्वांच्या नजरेसमोर आल्या मात्र परंतु आता लोकांची फडवणूक करणारे आणि खोट सांगणारे प्रवीण दरेकर यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी महेश तपासे यांनी केली

Leave a Comment