हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर ईडीचा छापा टाकण्यात आल्यानंतर राज्यातील राजकिय वातावरण तापलं असून भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत. त्यातच शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला लक्ष केले. सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करु असा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे त्यांच्या या इशाऱ्याला विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सुरुवातही जनताच करते आणि शेवटही जनताच करते हे संजय राऊत यांनी विसरु नये अस प्रवीण दरेकरांनी म्हंटल आहे.
माध्यमं आणि विरोधी मतं मांडणाऱ्या सर्वसामान्यांना जेलमध्ये टाकताना कुणी, कुणाला स्वपक्षाच्या शाखेप्रमाणे वागवलं होतं? सुरुवातही जनताच करते आणि शेवटही जनताच करते हे संजय राऊत यांनी विसरु नये असं म्हणत भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.
ईडीसारख्या तपास यंत्रणेवर चिखलफेक करणं उचित नाही. @rautsanjay61 साहेब!
माध्यमं आणि विरोधी मत मांडणाऱ्या सर्वसामान्यांना जेलमध्ये टाकताना,कुणी, कुणाला स्वपक्षाच्या शाखेप्रमाणे वागवलं होतं?
सुरुवातही जनता करते आणि शेवटही जनताचं करते, #ED @TV9Marathi @abpmajhatv @TheMahaMTB— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) November 24, 2020
नक्की काय म्हणाले होते संजय राऊत –
काही झालं तरी आमचं हे सरकार, आमदार आणि नेते हे कोणालाही शरण जाणार नाहीत. आम्ही लढत राहू. एजन्सीचा वापर करुन जे सरकारवर दबाव आणू इच्छितात त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. “आम्ही कोणाच्या बापाला भीत नाही. अटक करायची असेल तर अटक करा. नोटीस कसल्या पाठवत आहात. हिंमत असेल तर घरी या,” असं जाहीर आव्हानच संजय राऊत यांनी दिलं आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’