हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्रीय मंत्रिमंडळात भाजप खासदार नारायण राणे यांना लघू आणि मध्यम उद्योग खात्याचं मंत्रिपद देण्यात आल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हंटल होत की राणे यांना जे पद मिळालं त्यापेक्षा त्यांची उंची मोठी आहे. यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राऊतांवर पलटवार केला आहे.
दरेकर म्हणाले, नारायण राणे यांना काही मिळाले तरी ते संजय राऊतांना छोटच वाटणार. राणे साहेबांची उंची ही आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना माहीत होती. त्यामुळेच त्यांनी राणे साहेबांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बसवलं होतं. परंतु आता संजय राऊत यांना राणे दोषाची काविळ झाली आहे, असा टोला दरेकरांनी लगावलाय.
नारायण राणे यांना मिळालेलं खातं छोट आहे की मोठं हे येणाऱ्या काळामध्ये राणेसाहेब त्यांच्या कार्यपध्दतीतुन दाखवून देतील. त्यांना कोणतही खातं दिलं असतं तरी त्या खात्याला वजन प्राप्त करत जनतेला मदत करायचं काम करतील, असा विश्वासही यावेळी दरेकरांनी व्यक्त केला.