बैठकीत मुजरा अन् मीडियात गोंधळ अशी नाना पटोलेंची अवस्था; दरेकरांची सडकून टीका

Darekar Nana Patole
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा अशा प्रकारे नाना पटोले यांचा बैठकीत मुजरा आणि मीडियात गोंधळ चालला आहे. एक गोंधळी नाना म्हणून नवं कॅरेक्टर या निमित्ताने महाराष्ट्राला बघायला मिळालं अशा शब्दांत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी नाना पटोलेंवर हल्लाबोल केला आहे.

सर्व पक्षीय ओबीसी बैठकीमध्ये ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागल्याशिवाय निवडणुका होऊ नये यावर एकमत झाले आहे. मात्र ओबीसींचे राजकीय आरक्षण भाजपमुळे गेले असल्याची टीका नाना पटोले यांनी केली होती. यावर भाजप कडून प्रवीण दरेकर यांनी नानांच्या आरोपाचा कडक शब्दात समाचार घेतला.

दरेकर म्हणाले, नाना पटोले यांचा नवा चेहरा महाराष्ट्राला पाहायला मिळाला आहे. आपल्याकडे एक चित्रपट आहे गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा तर नानांचा बैठकीत मुजरा आणि मीडियात गोंधळ असं एक गोंधळी नाना पटोले म्हणून नवं कॅरेक्टर महाराष्ट्राला पाहायला मिळालं अशी टीका दरेकरांनी केली. देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या बैठकीत आणि आजच्या बैठकीत ओबीसी आरक्षणाचा तिढा कसा सुटावा यासंदर्भात संपुर्ण अभ्यासपुर्ण मार्गदर्शन केलं ज्या आधारे आता आपण अंतिम निर्णयापर्यंत पोहचू शकतो त्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही समर्थन केल आहे.

अस असताना त्या सभागृहातील बैठकीत देवेंद्र फडणवीस यांचे समर्थन करत असताना नाना पटोलेंच्या रक्तातील राजकीय अभिनिवेश मीडियासमोर आल्यानंतर जाऊ शकत नव्हता आणि म्हणून या ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात जी काही दिरंगाई झाली ती भाजपमुळे झाली असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. खरं तर नानांना राजकीय कावीळ झाली आहे यामुळे राजकीय वक्तव्य केल्याशिवाय त्यांना स्वस्थ बसता येत नाही आहे. अशी खोचक टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे.