हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्ष भाजप चांगलाच आक्रमक झाला असून ठाकरे सरकार वर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. ठाकरे सरकारच्या अंतर्गत समन्वय नसल्यामुळे महाराष्ट्राची जनता मात्र भरडली जातेय असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. तसेच बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधानिक आरक्षण दिलं आहे, त्यालाच बगल देण्याचं काम दुर्दैवाने महाविकासआघाडी सरकारच्या माध्यमातून होताना दिसत आहे.” असा आरोप दरेकरांनी केला आहे.
मराठा आरक्षणाच्या बाबतीत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले ते आरक्षण संविधानिक पद्धतीने व आयोग नेमून दिलं होतं. ते उच्च न्यायालयात टिकलं व सर्वोच्च न्यायालयाने देखील फेटाळलं नाही. त्याचे लाभ देखील सुरू झाले. परंतु आता राज्य सरकारचा ढिसाळपणा व प्रत्येक कामात दिरंगाई, वेळेवर कागदपत्र उपलब्ध करून न देणे असा एकंदरच निष्काळजीपणा यामध्ये आरक्षण आम्ही गमावून बसलो.” असं दरेकर यांनी म्हंटल.
महाविकास आघाडी सरकारमध्ये असलेल्या पक्षांमध्ये अंतर्गत बेबनाव व विसंवाद दिसून येतो. अंतर्गत समन्वय नसल्यामुळे यांचा खेळ होतोय, परंतु महाराष्ट्राची जनता मात्र भरडली जातेय! @CMOMaharashtra @BJP4Maharashtra @bjp4mumbai pic.twitter.com/hZfL3aiidt
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) June 4, 2021
ते पुढे म्हणाले, पदोन्नती आरक्षणाच्या निर्णयाबाबतही सरकारमध्ये राहून मंत्री नितीन राऊत यांची भूमिका वेगळी आहे आणि सरकार कॅबिनेटमध्ये निर्णय घेत नाही. म्हणजे तो देखील त्या ठिकाणी तसाच विषय ठेवला आहे. आणि त्यानंतर आता ओबीसी राजकीय आरक्षणाचा विषय आहे. म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधानिक आरक्षण दिलं आहे, त्यालाच बगल देण्याचं काम दुर्दैवाने महाविकासआघाडी सरकारच्या माध्यमातून होताना दिसत आहे.” असा आरोप दरेकरांनी केला आहे.
महाविकास आघाडी सरकारमध्ये असलेल्या पक्षांमध्ये अंतर्गत बेबनाव व विसंवाद दिसून येतो. अंतर्गत समन्वय नसल्यामुळे यांचा खेळ होतोय, परंतु महाराष्ट्राची जनता मात्र भरडली जातेय! @CMOMaharashtra @BJP4Maharashtra @bjp4mumbai pic.twitter.com/hZfL3aiidt
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) June 4, 2021
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.