जर तुमच्यात राज्य चालवायची धमक आहे तर मग केंद्राकडे बोट का दाखवता ; विखे पाटलांचा संतप्त सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाविकास आघाडी स्थापन करताना तुम्ही काय केंद्राला विचारलं होत का ??? त्यामुळे केंद्र सरकारवर टीका करणे म्हणजे आपले स्वतःचे अपयश झाकायचे आणि केंद्राकडे बोट दाखवायचे, असा हा प्रकार आहे. जर तुमच्यात राज्य चालवायची धमक आहे तर मग केंद्राकडे बोट का दाखवता?”, असा संतप्त सवाल भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी ठाकरे सरकारला केला आहे.  तसेच तुम्ही सर्व तत्व पायदळी तुडवून सत्ता स्थापन केलीये. तर मग सत्ता टिकवण्याचे तुमचे काम आहे, असं विखे म्हणाले.

केंद्र सरकारवर टीका करणे म्हणजे आपले स्वतःचे अपयश झाकायचे आणि केंद्राकडे बोट दाखवायचे असा प्रकार आहे. तुम्ही राज्यातील जनतेसाठी स्वत: काय करणार, हे आधी राज्यातील जनतेला सांगा, असं विखे पाटील म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या एक हाती सत्तेच्या आव्‍हानावरुन शरद पवारांनी स्पष्ट केलं की मी हे 30 वर्षापासून ऐकतोय. त्यामुळे या महाविकास आघाडी सरकारमध्ये जो बेबनाव तयार होत चाललाय त्याचं हे उदाहरण असल्याचा टोला विखे पाटलांनी लगावला.

मंदिर उघडण्यावरून विखे पाटलांनी राज्य सरकारला अनेक सवाल उपस्थित केले. सरकार मंदिर उघडायला का घाबरतंय? यांना परमेश्वराची एवढी भीती का वाटते?”, असा सवाल त्यांनी सरकारला केला. “प्रत्येकाचे दैवत आहे. सर्व धर्मांना आपलं स्वातंत्र्य आहे. तुम्ही मदिरालय उघडाला परवानगी दिली मात्र, मंदिर उघडायला परवानगी देत नाही. हा भावनिक मुद्दा नसून अनेकांचे रोजगार गेले आहेत. व्यवसाय उध्वस्त झालेत. तुम्ही सर्वार्थाने विचार केला पाहिजे, अन्यथा सरकारला याची मोठी किंमत मोजावी लागेल”, असा इशारा विखेंनी दिला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’