रोहित पवार तुम्ही आरशात बघा नाहीतर सरकारला आरसा दाखवा – राम सातपुते

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | आज केंद्र सरकार अर्थसंकल्प सादर करणार आहे. यावरुन आता सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यात बजेटमध्ये कशाला प्रधान्य असावे यावरुन टिका टिपण्णी सुरु आहे. अशात भाजपचे आमदार राम सातपुते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यावर निशाणा साधलाय. रोहित पवार तुम्ही आरशात बघा नाहीतर सरकारला आरसा दाखवा असं म्हणत सातपुते यांनी पवार यांच्यावर निशाणा साधलाय.

आपण ज्या महाराष्ट्र सरकारचे महाभाग आहात त्या सरकारने काय दिवे लावले कोरोना काळात ..? सर्वात जास्त प्रवासी मजुरांचे हाल महाराष्ट्र सरकारच्या नाकर्त्या आणि हलगर्जी धोरणाने झाले. आपण आरशात बघा नाहीतर सरकारला आरसा दाखवा. लोकांना अन्नपाण्यावाचून पायपीट करावी लागली असं सातपुते यांनी म्हटले आहे.

रोहित पवार यांच्या एका ट्विटला प्रत्युत्तर देताना सातपुते यांनी त्यांच्यावर हल्ला केला. कोरोनाच्या सुरुवातीला मजूरवर्ग उन्हातान्हात चालत जाताना, नोकरदार पगाराअभावी हलाखीत जगत असताना केंद्र सरकारने मदत दिली नाही. कारण तेंव्हा दिलेली मदत वाया गेली असती, असं आर्थिक पाहणी अहवालातील निरीक्षण वाचून मन सुन्न झालं. असा विचार करणं कितपत योग्य आहे? असं ट्विट पवार यांनी केले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like