हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात पंकजा मुंडे यांच्या बहीण प्रीतम मुंडे यांना स्थान देण्यात आलं नसून पंकजा मुंडे नाराज असल्याचं बोललं जातं होत. त्यातच राज्यभर त्यांच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले असून त्याच पार्श्वभूमीवर आज त्यांनी मुंबईत भाजपच्या पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची एक बैठक बोलावली आहे. दरम्यान या सर्व परिस्थितीवर भाजप नेते आणि माजी मंत्री राम शिंदे यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.
प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही. त्यामुळे मुंडे समर्थक नाराज होणं स्वाभाविक आहे. पण पंकजा मुंडे वेगळा निर्णय घेतील असं वाटत नाही, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
आपल्या मनासारखा निर्णय झाला नाही तर आपण घरात देखील नाराजी व्यक्त करतो. सध्या देवेंद्र फडणवीस राज्यातील पक्षाचे प्रमुख नेते आहेत. ते माजी मुख्यमंत्री आहेत आणि विरोधी पक्षनेतेही आहेत. त्यामुळे घरच्या कारभाऱ्याकडे नाराजी व्यक्त होणं स्वाभाविक आहे. पण त्यातून मार्ग निघेल, असंही ते म्हणाले.