खासदारकी माझ्या बापाची आहे का? दानवेंचा अप्रत्यक्षपणे खोतकरांना इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जालना लोकसभा मतदारसंघ हि काय माझ्या बापाची जहागिरी नाही पण हि जागा भाजपची आहे, त्यामुळे भाजप ही जागा सोडणार नाही अशा शब्दात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी अर्जुन खोतकर याना अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यामुळे अर्जुन खोतकर शिंदे गटात सामील झाल्यानंतरही रावसाहेब दानवे यांच्यातील वाद काही मिटण्याही चिन्हे दिसत नाहीत.

जालना लोकसभेची जागा भाजपने ९ वेळा जिंकलेली आहे. २५ वर्ष मी, २ टर्म पुंडलिकराव आणि २ टर्म उत्तमसिंग पवार हे या जागेवर लढले आणि जिंकले. ही जागा रावसाहेब दानवेच्या बापाची नाही, उद्या जरी मी जागा सोडली तरी पक्ष सोडेल का?? पक्ष म्हणेल तुम्ही घरी बसा, आम्ही दुसरा बघतो असं म्हणत जालना लोकसभेची जागा सोडणं हे माझ्या हातात नसून भाजपच्या हातात आहे असे स्पष्टीकरण रावसाहेब दानवे यांनी दिले.

दरम्यान, एकनाथ शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे. भाजप आणि शिंदे गट सरकारची अडीच वर्ष व्यवस्थित पार पाडेल. सरकारमध्ये कोणीही नाराज नाही असेही दानवे म्हणाले. येणाऱ्या सर्व स्थानिक संस्था निवडणुका, महापालिका आणि विधानसभा निवडणुका आम्ही एकत्र लढू आणि विधानसभेला २०० जागा मिळवून पुन्हा सत्ता मिळवू असा विश्वास रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला.