कोल्हापूर प्रतिनिधी | सतेज औंधकर
भाजपा सरकारच्या काळात वरिष्ठ नेत्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणाची गंभीर दखल राज्य सरकारनं घेतली आहे. गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी या घटनेची चौकशी सुरू केल्याचं सांगितलं आहे. फोन टॅपिंग संदर्भात एक नियमावली आहे. ही नियमावली तोडून काही घडलं आहे का किंवा कुणाच्या परवानगीने हे झालंय का याची चौकशी राज्य सरकारने सुरू केली असल्याचं गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी सांगितलं आहे. कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे सांगितलं.
काही तांत्रिक बाबींची तपासणी करण्यात आली असून परदेशात काही लोकांना पाठवून वेगळी तपासणीही करण्यात आल्याचं सतेज पाटील यावेळी बोलताना म्हणाले.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फोन टॅपिंग प्रकरणाचा गौप्यस्फोट केल्यानंतर शहर विभागाचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी यासंदर्भातील पुरावे गृहमंत्रालायकडे आल्यामुळेच ही कार्यवाही तातडीने करावी लागेल असं मत व्यक्त केलं.
ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”
हे पण वाचा-
वाट चुकल्यानंतर पावसात जोडीदार सोबत असला की बरं वाटतं, श्रीनिवास पाटलांची पुण्यात खुमासदार फटकेबाजी
शरद पवारांचा शहरी नक्षलवाद्यांना वाचवण्याचा प्रयत्न – विनोद तावडे
13 वर्षाची मुलगी 10 वर्षाच्या मुलाकडून गर्भवती; डॉक्टरांना धक्का तर कुटुंब हैराण