रत्नागिरीः हॅलो महाराष्ट्र – सध्या राहुल गांधी भारत जोडो यात्रा करत आहेत. हि यात्रा जेव्हा महाराष्ट्रात आली असताना राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केली. यानंतर महाराष्ट्राचे राजकारण मोठ्या प्रमाणात तापले. त्यामुळे भाजपमधील नेत्यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. यादरम्यान आता भाजपचे प्रवक्ते चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule) यांनीदेखील आज राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस नेत्यांच्यावर जोरदार टीका केली.
काय म्हणाले बावनकुळे?
राहुल गांधी यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी काय माहिती आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर राहुल गांधी यांनी एकदा रत्नागिरीमध्ये येऊन पाहावं. म्हणजे त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर कळतील. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी बोलायला तुमची लायकी तरी आहे काय? असा सवालदेखील बावनकुळे यांनी केला आहे. चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule) यांच्या या विधानानंतर काँग्रेस-भाजप यांच्यात आता वाद रंगण्याची शक्यता आहे.
राहुल गांधी यांनी ज्यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केली. अशा परिस्थितीत जर हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असते तर राहुल गांधींना महाराष्ट्रातून हाकलून लावले असते. मात्र आता उलटच गडत आहे. त्यांचे नातू आता टीका करणाऱ्यांची गळाभेट घेत आहेत असा टोलासुद्धा बावनकुळे (chandrashekhar bawankule) यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला.
हे पण वाचा :
200 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या ‘या’ प्लॅनमध्ये ग्राहकांना दिले जातात अतिरिक्त फायदे
राज्यात तलाठ्यांची 4000 पदे भरण्यात येणार
लग्नासाठी मुलगी पहायला जाताना आयशर-कारचा भीषण अपघात
सत्तारांना मुख्यमंत्र्यांनी खडसावले; सुप्रिया सुळेंची माफी मागण्याचे आदेश?
पत्नीच्या आजारपणामुळे कर्जबाजारी झाल्याने नैराश्यतेून पतीने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल