हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । त्रिपुरामध्ये मस्जिद पाडल्याच्या कथित घटनेचे पडसाद अमरावतीमध्ये उमटले. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. राऊत यांच्या टीकेचा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी समाचार घेतला आहे. “राऊत यांनी उधळलेली मुक्ताफळे ऐकून त्यांची किव येते. राजकारणासाठी ते किती लाचार झाले आहेत हे दिसत आहे. आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जिवंत असते, तर त्यांनी एक थोबाडीत मारली असती !”, अशी घणाघाती टीका पाटील यांनी केली आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केल्यानंतर त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करीत टीका केला. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, संजय राऊत यांनी उधळलेली मुक्ताफळे ऐकून त्यांची किव येते! राजकारणासाठी ते किती लाचार झाले आहेत हे दिसत आहे. आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जिवंत असते, तर त्यांनी एक थोबाडीत मारली असती! तुम्ही राज्य करा, मुस्लिमांची मतं मिळवा, कोण नाही म्हणतंय? असा सवाल पाटील यांनी केला आहे.
केवळ ५ टक्के मुस्लिम गडबड करतात परंतु ९५ टक्के प्रामाणिक आहेत. मालेगाव, नांदेडमध्ये जे अस्वस्थता माजविण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांच्यावर पूर्वीसारखा निषेध करा! केवळ मुस्लिम मतांची काळजी करू नका. जे ५ टक्के मुस्लिम गडबड करत आहेत त्यांच्यावर तुम्ही टीकापण नाही करणार का? तुम्हाला झोपताना, उठताना केवळ भाजपा दिसते. एसटी कर्मचाऱ्यांचा संप आम्ही सुरु केला, आरोग्य विभागाच्या परीक्षेचा पेपर आम्ही फोडला, शेतकऱ्यांचे पैसे आम्ही थांबवले, काय चेष्टा चालली आहे का? सर्वसामान्य जनतेला हे कळत नाही आहे का?
संजय राऊत यांनी उधळलेली मुक्ताफळे ऐकून त्यांची किव येते! राजकारणासाठी ते किती लाचार झाले आहेत हे दिसत आहे. आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जिवंत असते, तर त्यांनी एक थोबाडीत मारली असती! तुम्ही राज्य करा, मुस्लिमांची मतं मिळवा, कोण नाही म्हणतंय?
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) November 13, 2021
सगळीकडे जर भाजपाचा हात आहे असं तुम्ही म्हणता, मग तुम्ही ३ पक्ष समर्थ आहात ना? भाजपाचा हात कापून काढा ना तुम्हाला कोणी अडवलं आहे? तीन पक्ष एकत्र असूनही तुम्ही दुबळे आणि तुमचे सरकार पूर्णपणे अपयशी आहे !राज्याचे माजी गृहमंत्री तुरुंगात आहेत. आजी गृहमंत्री आता आजारातून उठले आहेत तर मुख्यमंत्री हॉस्पिटलमध्ये आहेत. सध्या बाहेरून सरकार चालवणारे मात्र आहेत, असे पाटील यांनी म्हंटले आहे.