हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरून राजकारण चांगलेच तापले आहे. भाजप विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष सुरु झाला आहे. भाजप नेत्यांकडून सरकारमधील नेत्यांवर टीका केली जात आहे. दरम्यान आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करायला सरकारला धाड भरली आहे का?, असा सवाल यावेळी पाटील यांनी केला.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीकाही केली. ते म्हणाले की, प्रत्येकवेळी केंद्राकडे बोट दाखवायचे काम राज्य सरकारकडून केले जात आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत व आंदोलनाच्या प्रश्नाबाबत सांगायचे झाले तर इतकी असंवेदनशीलता, मुजोरी कुठून येते? ज्या प्रकारे महाराष्ट्रात एसटीचे आदिलन चिरडण्याचा प्रकार चालला आहे. मेस्मा कायद्याखाली एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई करता, नोटीस बजावत.
एसटी कर्मचाऱ्यांच्यावर कारवाई करून त्यांना नोटीस पाठविल्या जात आहेत. त्यांचेच १७ महिन्यांचे पगार द्यायचे आहेत. बोनस आधीच हजार रुपये दिला आहे. माझ्या घरातील ताईला मी पाच हजार रुपये बोनस दिला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करायला या सरकारला काय धाड भरली आहे काय? असा सवाल यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.