हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तीन दिवसाच्या पार पडलेल्या अधिवेशनातील गोंधळावरून तसेच राज्यातील ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षणास निवडणुकांवरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी ठाकरे सरकावर आज निशाणा साधला. ओबीसी आरक्षणात गोंधळ, मराठा आरक्षणात गोंधळ, ठाकरे सरकारच्या गोंधळावर पीएचडी होऊ शकते,असा टोला पाटील यांनी लगावला.
भाजप नेते चंद्रकांतदादा पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, तीन दिवसांच्या अधिवेशनातही आरक्षणाच्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली. एकंदरीत पाहता या अधिवेशनात ओबीसी आरक्षणात गोंधळ, मराठा आरक्षणात गोंधळ असे पहायला मिळाले. या ठाकरे सरकारच्या गोंधळावर पीएचडी होऊ शकते. कोरोना आणि आता ओबीसी आरक्षणाच्या निर्णयामुळे निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत.
सहा जिल्ह्यांच्या ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत वाद झाला. या राज्यात ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण, एसटी कर्मचारी संपात गोंधळ, शेतकऱ्यांच्या मदतीतही गोंधळ झाला. या ठाकरे सरकारच्या आतापर्यंतच्या गोंधळावर आता पीएचडी होऊ शकते. ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत कोर्टाने फटकारले. त्यामुळे आता कोर्टाला जर निवडणुका पुढे ढकलायला लावायच्या असतील तर तसे ठोस कारही कोर्टापुढे सादर केले पाहिजे, असे पाटील यांनी सांगितले.