हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अटक करण्यात आल्याने भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षातील वाद आता विकोपाला पोहचला आहे. या दरम्यान, भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी मंत्री राणेंवरील कारवाईबाबत संताप व्यक्त केला आहे. “नारायण राणे यांच्या अटेकसाठी तत्परता दाखवणं आणि इतर प्रकरणी तत्परता न दाखवणं हीच तुमची शिवशाही आहे का? असा सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे.
भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी मंत्री राणेंच्या अटकेबाबत ट्विट करीत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. “सरकार हमसे डरती है…..पुलिस को आगे करती है…” असे ट्विट करीत ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. दरम्यान भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी माध्यमांशी संवाद साधत राज्य सरकारवर टीकाही केली. यावेळी त्या म्हणाल्या की, “अटक करण्याची आणि गुन्हे दाखल करण्याची तत्परता ही फक्त भाजप नेत्यांसाठी आहे का?, कायदे आणि नियम फक्त भाजपसाठी आहे, सत्ताधाऱ्यांना लागू होत नाही.”
सरकार हमसे डरती है…..पुलिस को आगे करती है….. @CMOMaharashtra @maharashtra_hmo @BJP4Maharashtra
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) August 24, 2021
मंत्री नारायण राणे यांच्या अटकेबाबत वाघ यांनी राज्य सरकारला सवालही उपस्थित केला आहे. यावेळी त्या म्हणाल्या की, “राणेंच्या अटकेबाबत जी तत्परता राज्य सरकारने दाखवली ती तत्परता कुठे गेली आहे? पुणे, औरंगाबाद आणि पारनेर मध्ये का नाही दाखवली? असा सवाल वाघ यांनी केला आहे.