सत्तेतले हे बेलगाम घोडे…म्हणत चित्रा वाघ यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

0
124
chitra wagh
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अहमदनगरला पारनेर तहसीलदार ज्योती देवरे यांनी ऑडिओ क्लिप तयार करून आत्महत्येचा इशारा दिल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या प्रकारावरून भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. ‘सत्तेतले हे बेलगाम घोडे…देवमाणूस म्हणून मिरवणाऱ्या पारनेरच्या लोकप्रतिनिधीच्या नाकात वेसणं घालायचं काम महिला सशक्तीकरणाच्या बाता मारणाऱ्यांकडून होतयं का तेचं आता पहायचयं’, अशा शब्दात वाघ यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांच्याकडून सध्या महाविकास आघाडी सरकार टीकास्त्र डागले जात आहे. अनेक प्रकीर्णनावरून वाघ यांनी राज्य सरकारला धारेवरही धरले आहे. दरम्यान, अहमदनगरला पारनेर तहसीलदार ज्योती देवरे यांनी ऑडिओ क्लिप तयार करून आत्महत्येचा इशारा देण्याची घटना घडली असून यावरून आता वाघ यांनी राज्य सरकारवर ट्विट करीत निशाणा साधला आहे.

वाघ यांनीआपल्या ट्विटमध्ये म्हंटल आहे की, पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची ऑडीयो क्लीप ऐकली…..आणि मन सुन्न झालं आहे. सत्तेतले हे बेलगाम घोडे…देवमाणूस म्हणून मिरवणाऱ्या पारनेरच्या या लोकप्रतिनीधीच्या नाकात वेसणं घालायचं काम महिला सशक्तीकरणाच्या बाता मारणार्यांकडून होतयं का तेचं आता पहायचयं,”असे वाघ यांनी म्हंटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here