Monday, January 30, 2023

भाजपाचा उद्या नांदगावात धनगर समाजाचा भव्य मेळावा

- Advertisement -

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
भारतीय जनता पार्टीच्या लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे शुक्रवारी (ता. 11) कराडच्या दौऱ्यावर येत आहेत. यानिमित्त त्यांच्या प्रमुख उपस्थितीत नांदगाव (ता. कराड) येथील श्रीराज मंगल कार्यालयात सायंकाळी 6.30 वाजता कराड दक्षिणमधील धनगर समाजबांधवांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती, भाजपाचे तालुकाध्यक्ष पैलवान धनंजय पाटील यांनी दिली आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की गेल्या लोकसभा निवडणुकीत ज्या जागांवर भाजपाला विजय मिळविता आला नाही, त्या सर्व जागांवर येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार निवडून आणण्याचे लक्ष्य पक्षाने निश्चित केले आहे. याअंतर्गत नुकताच सातारा लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री ना. सोमप्रकाश, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, माजी मंत्री बाळा भेगडे यांनी दौरा करत विविध सभा घेतल्या आहेत. तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे.

- Advertisement -

या मेळाव्याला पक्षाचे प्रदेश सचिव विक्रम पावसकर, जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे, लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या मेळाव्याला तालुक्यातील धनगर समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन तालुकाध्यक्ष श्री. पाटील यांनी केले आहे.