भाजप आंदोलन करायला कधीच घाबरणार नाही; आशिष शेलारांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मुंबईत शिवसेना भवनासमोर भाजप व शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. या राड्यावरून  आता भाजप व शिवसेना नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप करणे सुरु झाले आहे. दोन्ही पक्षातील नेत्यांकडून एकमेकांना इशारे दिले जाताहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत व परिवहनमंत्री अनिल परब यांनी शिवसेना भवनातील राड्यावरून एक वक्तव्य केले. त्यांच्या वक्तव्यावरून भाजपचे नेते आशिष शेलार यांनी थेट इशारा दिला आहे. “भाजप आंदोलने करायला कधीच घाबरत नाही. आम्हीही आंदोलने करणारच आहोत. असा इशारा शेलार यांनी यावेळी दिला आहे.

भाजपचे नेते आशिष शेलार यांनी वर्ध्यात माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेना व भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यावरून शिवसेनेला इशारा दिला आहे. यावेळी शेलार म्हणाले, “राम मंदिराच्या मुद्यावरून सेना भवनासमोर झालेल्या गदारोलावर खासदार संजय राऊत आणि परिवहनमंत्री अनिल परब यांनी भाजपाला उत्तर देऊ,” असं वक्तव्य केले होते. यावर शेलार यांनी प्रतिउत्तर दिले आहे.

यावेळी आशिष शेलार म्हणाले, ” भाजपने ओबीसी आरक्षणासाठी आंदोलनाची घोषणा केली आहे. महाविकास आघाडी सरकारमधील नेते छगन भुजबळ, नाना पटोले, विजय वडेट्टीवार हे ओबीसींचं नेतृत्त्व आहे असेच भासवत आहेत. हे तिघेजण महाविकास आघाडी सरकारमध्ये वेगळी भूमिका घेतातआणि बाहेर वेगळी भूमिका घेत आहेत. वास्तविक पाहता आघाडी सरकारच खरं पाप हे आरक्षण न टिकवणे हे आहे.

You might also like