हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात सध्या रेमडेसिवीर या औषधाचा तुटवडा आहे. केद्रांकडून हा पुरवठा योग्य त्या प्रमाणात होत नसल्याची टीका राज्य सरकारमधील नेत्यांकडून केली जात आहे. असे असतानाच महाराष्ट्रासाठी भाजपाकडून ५० हजार रेमडेसीवर इंजेक्शन उपलब्ध करून देण्याची घोषणा विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे.
इंजेक्शन उपलब्ध होण्यासाठी विधानपरिषद विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दमणला भेट दिली आहे. दमणला रेमडेसिविर इंजेक्शनची निर्मिती करणाऱ्या खाजगी कंपन्यांशी दरेकर यांनी चर्चा केली आहे. भाजपकडून राज्यासाठी 50 हजार रेमडेसिविरची इंजेक्शने उपलब्ध करून देऊ अशी घोषणा दरेकर यांनी केली आहे.
महाराष्ट्रातील रेमडेसिवीरचा तुटवडा पाहता, मा. @Dev_Fadnavis जी यांनी काही कंपन्यांशी चर्चा केली. त्यांचे एक पत्र घेऊन आम्ही दमण येथे ब्रूक फार्मा प्रा.लि. यांच्याशी चर्चा केली आणि महाराष्ट्राला रेमडेसिवीर उपलब्ध करून देण्याची मागणी केली.@PrasadLadInd @BJP4Maharashtra pic.twitter.com/66LxsFmVVD
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) April 12, 2021
ग्रुप फार्मसीचे मालक अंशू यांनी महाराष्ट्राला लागेल तितका रेमडेसीवीरचा साठा देण्याचे आश्वासन दिले असून देशभरात वाटप करण्याची परवानगी मिळवण्यासाठी केंद्र सरकारला अर्जही केला आहे. केंद्राकडून परवानगी मिळताच महाराष्ट्रात रेमडेसीवीर इंजेक्शनचे वाटप सुरू करण्यात येईल, अशी माहिती दरेकर यांनी दमण येथून दिली आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा WhatsApp Group | Facebook Page