हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | येत्या १९ सप्टेंबर पासून गेणेशोत्सवाला सुरुवात होणार असून सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. सर्वजण गणरायाची अगदी आतुरनेते वाट पाहत आहेत. खास करून कोकणात गणेशोत्सव मोठया धुमधडाक्यात साजरा केला जातो. मुंबईसारख्या ठिकाणी नोकरीला असणारा कोकणी चाकरमानी गणेशोत्सव काळात हमखास सुट्टी टाकून गावी म्हणजेच कोकणात जातो आणि गणरायाची पूजा करतो. अशाच कोकणी चाकरमान्याना खुश करण्यासाठी भाजपने मोफत ट्रेन आणि बसेसची मोहीम राबवली आहे. भाजप मुंबईतून 6 ट्रेन आणि 250 बस कोकणात सोडणार आहे. त्यामुळे गणेशभक्त अगदी फुकट मध्ये आपल्या घरी जाऊ शकतात.
या वर्षी कोकणात जाणाऱ्यासाठी भाजपने मोफत बस प्रवास देऊ केला आहे. भाजपाने मुंबई मधून तब्बल 250 बसेस कोकणात जाण्यासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. ज्यांच्या माध्यमातून मुंबईतून कोकणात कोकणी माणूस मोफत प्रवास करू शकेल. त्याच बरोबर रेल्वे च्या माध्यमातून 6 विशेष रेल्वे ” मोदी एक्सप्रेस ” च्या नावाने चालवल्या जातील. या सर्व विशेष रेल्वेचा खर्च “मुंबई भाजपा ” च्या माध्यमातून केला जाईल.
येत्या शुक्रवारी मोफत बस सेवेला दाखवला जाणार हिरवा झेंडा
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री येत्या शुक्रवारी मोफत बस सेवेला हिरवा झेंडा दाखवून या सेवेचा प्रारंभ करतील . त्यानंतर पुढे दोन दिवस ही बससेवा सुरु राहील. यांचप्रमाणे ” मोदी एक्सप्रेस ” मुंबईतील दादर येथून चालवली जाईल. पुढे या एक्सप्रेस ला कोकणातील प्रमुख स्थानाकावर थांबा दिला जाईल. ही गाडी चिपळूण, रत्नागिरी, कणकवली तसेच सावंतवाडी या स्थानकांवर थांबणार आहे. कोकणी मते वळवण्यासाठी भाजप अश्या सुविधा देत असल्याचे बोलले जात आहे.
कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी
दरम्यान, राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारने कोकणी गणेशभक्तांसाठी आणखी एक खुशखबर दिली आहे. त्यानुसार, कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी सरकारकडून टोल माफ करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांचे 600 ते 700 रुपये वाचणार आहेत. मात्र, यासाठी पास काढावा लागणार आहे. मुंबई शहरासह ठाणे, पालघर इथल्या नागरिकांना जवळच्या पोलीस स्टेशन आणि आरटीओकडून हे पास घ्यावे लागणार आहे.