फडणवीसांच्या समर्थनार्थ भाजप एकवटणार; बीकेसीत उद्या शक्तिप्रदर्शन करणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते देवेंद्र फडणवीस याना पोलीस बदल्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली असून उद्या ते चौकशीसाठी बीकेसी येथे पोलिस स्टेशनमध्ये उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, या नोटीशीनंतर देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ उद्या भाजपकडून शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. फडणवीस यांनी विधानसभेत सरकारी षडयंत्राचा पर्दाफाश केला. त्यामुळे हे महाविकास आघाडीचे सरकार हादरले आहे. सरकार अडचणीत येत असल्याचे लक्षात आल्याने नेते सैरावैरा पळायला लागले आहेत. त्याला सामोरे जावे लागत असल्याने मग भाजपचं जे शक्तिस्थान, नेतृत्व आहे. त्याला हात घालता येतं का? असा प्रयत्न सरकार काडून सुरु आहे मात्र देवेंद्र फडणवीस हे कुठल्याही घोटाळ्यात सामील नाहीत. कुठल्याही अनधिकृत गोष्टींमध्ये ते सापडू शकत नाहीत. अशा वेळी असं कुठलं तरी फुटकळ कारण देऊन नोटीस बजावली आहे अस दरेकर यांनी म्हंटल.

दरम्यान, उद्या 11 वाजता BKC सायबर ठाण्यात मी जाणार आहे. मी विरोधी पक्षनेता आहे त्यामुळे माझ्या माहितीचा स्रोत मला विचारला जाऊ शकत नाही. तरीही मी स्वतः तेथे जाणार आहे. पोलीस जी काही चौकशी करतील त्याला योग्य उत्तर मी देणार आहे, असं फडणवीसांनी सांगितलं. मात्र अपेक्षा इतकीच की माहिती बाहेर कशी आली याचा तपास करण्यापेक्षा, 6 महिने सरकार कडे हा अहवाल पडला होता, कोणी किती पैसे दिले कोणाला कुठली बदली झाली ही माहिती आहे, अशी सर्व माहिती त्यात असताना सरकारवर कारवाई झाली पाहिजे की ज्यांनी घोटाळा बाहेर काढला त्यांच्यावर झाली पाहिजे असे फडणवीस यांनी म्हंटल.

Leave a Comment