हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी उत्तरप्रदेश, पंजाब, मणिपूर, गोवा आणि उत्तराखंड या सर्वच राज्यात भाजपचीच सत्ता येईल असा विश्वास देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. मोदींनी एएनआय या वृत्तसंस्थाला दिलेल्या मुलाखतीत काँग्रेस वर सडकून टीका करत आगामी निवडणुकांवर भाष्य केले.
आगामी पाच राज्यांत भाजपला अँटी इन्कम्बन्सीचा फटका बसणार का?, असे विचारले असता पंतप्रधान मोदी यांनी ती शक्यता फेटाळली व पाचही राज्यांत भाजपची लाट असल्याचा दावा केला. पाच राज्यांतील चित्र स्पष्ट दिसत आहे. तिथे भाजपला बहुमत मिळणार आहे. जनता आम्हाला संधी देणार आहे. असे मोदी म्हणाले.
यापूर्वीच्या सरकारमध्ये निवडणुकांच्या तोंडावर योजनांच्या फाईलवर स्वाक्षरी करणे, निवडणुका आल्या की योजनांची घोषण करणे असे प्रकार चालायचे. त्यांना वाटत होते की, लोक काम नाही तर योजनांच्या घोषणा लक्षात ठेवतात. या सर्व प्रकारामुळे देशात अॅन्टी इन्क्मबन्सी येते, मात्र भाजपशासीत राज्यात हे सर्व प्रकार होत नसून, आम्ही कामावर भरोसा ठेवतो