साताऱ्यात भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन; नाना पटोलेंच्या अटकेची केली मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्यामुळे भाजपने चांगलाच आक्रम पावित्रा घेतला आहार. दरम्यान याचे पडसात सातारातही उमटले. सोमवारी भाजप कार्यकर्त्यांनी साताऱ्यात पोवई नाक्यावर एकत्र येत पटोले यांच्या निषेधार्थ तीव्र घोषणाबाजी केली. तसेच त्यांच्या अटकेची मागणीही केली.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर काल पुन्हा त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. “ज्याची बायको पळून जाते, त्याचे नाव मोदी ठरते,” असे आक्षेपार्ह वक्तव्य पटोले यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजप नेत्यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. सातारा जिल्ह्यातील भाजप कार्यकर्तेही आक्रमक झाले आहेत.

दरम्यान आज कार्यकर्त्यांच्यावतीने सातारा येथे अंदोलन केले. यावेळी महिलांच्या बाबतीत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बाबतीत अत्यंत खालच्या पातळीवर टीका करणाऱ्या नाना पटोलेंचा यावेळी निषेध नोंदवण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी सातारा येथील पोवई नका इथे एकत्र येत पटोले यांच्या प्रतिमेला जोडीमारून अंदोलन केले. यावेळी जोरदार घोषणाबाजीही केली.