फडणवीसांना नोटीस दिल्याच्या निषेधार्थ भाजपचे आंदोलन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी I प्रथमेश गोंधळे

पोलीस भरतीतील फोन टॅपिंग प्रकरणावरून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांना नोटीस बजावून त्यांच्या घरी चौकशीसाठी गेल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले. देवेंद्र फडणवीस यांच्या नोटीस प्रकरणावरून सांगलीत भाजपाने राज्य सरकारविरोधात आंदोलन केले आहे. यावेळी फडणवीस यांना बजावण्यात आलेल्या नोटिशीची प्रत फाडून निषेध करण्यात आला.

भाजपाचे राज्य सरचिटणीस पृथ्वीराज पवार आणि जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मारुती चौकात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारचा घोटाळा बाहेर काढणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनाच नोटीस बजावून त्यांचीच चौकशी करण्याचा डाव आखाणाऱ्या सरकारचा आणि पोलीस यंत्रणेचा जाहीर निषेध करण्यात आला. सरकारने खोट्या कारवाया करत विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्यास उग्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला.

Leave a Comment