पालघरमध्ये बंद कंपनीत सिलेंडरचा झाला मोठा स्फोट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पालघर : हॅलो महाराष्ट्र – केमिकल कंपनीत स्फोट (blast in chemical factory) होण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. पालघर जिल्ह्यातील बोईसर तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कंपनीत पुन्हा एकदा ब्लास्ट (blast in chemical factory) झाला आहे. हि कंपनी गेल्या काही दिवसांपासून बंद असल्यामुळं ही घटना कशी घडली याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या घटनेचा तपास केला असता तपासासून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
बोईसर तारापूर औद्योगिक क्षेत्रात औरा ऑइल या बंद असलेल्या कंपनीत गॅस कटरच्या सिलेंडरचा ब्लास्ट (blast in chemical factory) होऊन भीषण आग लागली. बंद असलेल्या कंपनीत गॅस कटरच्या सहाय्याने कंपनीतील साहित्याची चोरी करत असताना हा ब्लास्ट झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या भीषण अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमी व्यक्तीवर बोईसर मधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

यामध्ये सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ही कंपनी मागील अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत असून या कंपनीतील साहित्याची गॅस कटरच्या साहित्याने चोरी सुरू होती. अशाच पद्धतीने काही साहित्य गॅस कटरच्या सहाय्याने कट करत असताना गॅस सिलेंडरचा स्फोट (blast in chemical factory) होऊन ही भीषण दुर्घटना घडली. याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.

हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय