मुंबई प्रतिनिधी | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थळाला मुंबई महानगर पालिकेने डिफॉल्ट घोषित केले आहे. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या घरची पानपट्टीच भरली नाही. त्यामुळे मुख्यमंत्रीच थकबाकीदार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्र्याच्या वर्षा बंगल्याची थोडी थिडकी नव्हे तर ७ लाख ४४ हजार ९८१ रुपये मुख्यमंत्र्यांनी थकवले आहेत.
पाणीपट्टी थकवल्यास महानगर पालिका सर्व सामान्य माणसावर तातडीने कारवाही करते. मात्र महाराष्ट्रातील मंत्र्यांची तब्बल ८ कोटी रुपयांची पाणीपट्टी थकीत असून देखील महानगर पालिकेने मंत्र्यांवर अद्याप कारवाही केली नाही. त्यामुळे हा दुजाभाव का केला जातो आहे असा सवाल सर्व सामान्यांकडून विचारला जात आहे.
या मंत्र्यांच्या शासकीय निवास स्थानाची पाणीपट्टी आहे थकीत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (वर्षा बंगला),अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार (देवगिरी), शिक्षामंत्री विनोद तावडे (सेवासदन), ग्रामविकास महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे (रॉयलस्टोन), आदिवासीमंत्री विष्णू सावरा (सागर), जलसंपदामंत्री गिरीश महाजन (शिवनेरी), परिवहनमंत्री दिवाकर रावते (मेघदूत), उद्योगमंत्री सुभाष देसाई (पुरातन), पर्यावरणमंत्री रामदास कदम (शिवगिरी), सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे (नंदनवन), ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे (जेतवन), आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत (चित्रकुट), पशुपालन मंत्री महादेव जानकर (मुक्तागिरी)एकनाथ खडसे (रामटेक), विधानसभा सभापती रामराजे निंबाळकर (अजंठा)